Friday 6 November 2015

मनातलं चांदणं - भाग १

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.



Fri, Aug 22, 2014 at 8:51 PM

 Hi सविता,
(वरील 'सविता' हे तिचे बदललेले नाव आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.)

मला कल्पना आहे की माझा हा Mail बघताच तुझ्या तळपायाची आग मस्तकात जाणार, ...... आणि पुन्हा त्या जुन्या आठवणी नजरेसमोर उभ्या राहणार ....... पण हा एक Mail पाठवीणे मला खूप गरजेचे वाटते.

या Mail द्वारे मला एक विनंती करायची आहे, ती म्हणजे … तुझ्या मनात असलेला माझ्याबद्दलचा तिरस्कार आणि राग मनातून काढून टाक. माझ्याकडून तू बऱ्याच वेळा आणि बऱ्याच पद्धतीने दुखावली गेली आहेस ....... त्याची मला कल्पना आहे .......त्यामुळे तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप राग आणि तिरस्कार असणे स्वाभाविकच आहे.

आता मला जाणवते आहे की, कधीकाळी आपल्याकडून कोणीतरी खूप दुखावले गेले आहे. ........... त्या प्रत्येक वेळची परिस्थिती जरी भिन्न असली तरीही आपल्याकडून (दोघांकडूनही) झालेल्या चुका मात्र एकसारख्याच आणि तितक्याच बालीश होत्या. .......... कधी तुझा राग अनावर झाला तर कधी माझा, ........ पण या सगळ्याचा शेवट मात्र आज हा "असा Mail" पाठविण्यासारखा होतोय (......... तू सर्वकाही जाणतेसच).

पण, ........ आता मी असही म्हणत नाहीय की, "तू पुन्हा माझ्याशी मैत्री करावीस". ......... कदाचीत हा Mail वाचण्यापूर्वीपर्यंत तू मला पूर्णपणे विसरूनही गेली असशील ......... मग आता मला काहीच अधिकार नाही कि, "तू मला आता विसरून जा" म्हणण्याचा ....... तुझ्या लेखी हा Mail म्हणजे पुन्हा त्या जुना आठवणींना उजाळा असू शकतो.

पण, कधीकाळी जर तू माझ्यासाठी तुझ्या देवाजवळ माझ्या चांगल्यासाठी प्रार्थना केली असशील तर त्याला स्मरूण Please आता सुद्धा तितक्याच आत्मियतेने तुझ्या मनातील माझ्याबद्दलचा तिरस्कार काढून टाक. ...........

......... हे सगळं तुला पटेल की नाही मला माहिती नाही, आणि खरं तर मलाही तितकं पटत नाहीचय ......

पण कस आहे ना ......... ......... एखाद्या व्यक्तीच्या मनात आपली प्रतीमा खूप वाईट बनली असेल तर त्याच्या तिरस्कारजन्य शक्तीमुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण स्वास्थ बिघडून जाते ..........

असे काहीसे गेल्या दोन वर्षांपासून माझ्याबाबतीत सुद्धा घडू पाहतेय, ......... यात ना तुझा दोष आहे ना माझा ....... प्रत्येक घटनेसाठी वेळच कारणीभूत असते आणि त्यावर उपाय सुद्धा वेळच असते …………….. असे मला वाटते,

तरीसुद्धा या माझ्या विनंतीचा Please Seriously विचार कर आणि या Mail ला शेवटचा म्हणून का होईना पण एकदा Reply कर, ......... मग मी निरधास्थ होईन ......... आणि नव्या उमेदीने आकाशाला गवसणी घालण्यासाठी सामर्थ्य गोळा करू लागेन.

मला याची सुद्धा कल्पना नाहीय की तू हा Mail ID वापरतेस की नाही, पण एक आशा मात्र  नक्कीच आहे की वापरत असशील म्हणून, तरीसुद्धा तुझ्या Facebook Massage Box (https://www.facebook.com/******** I hope की ही Facebook Profile तुझीच असावी.) मद्धे हाच Mail मी Forward करीत आहे.

इतका मोठा E-Mail Type करून सुद्धा मला असे विचारावेसे वाटते की, "माझ्या भावना तुला कळल्या असतील".

.......... मी ...... तुझ्या शेवटच्या Reply ची वाट पाहत राहीन ....... ....... .......



...अपूर्ण
#SrSatish🎭

Follow Me